सहा महिने काबाडकष्ट ; आता कोरोना संकटामुळे घरी परतता येईना; होम क्वारंटाईन जरुर करा; पण सुविधाही उपलब्ध करुन द्या
बीड : उचल घेऊन सहा महिने ऊसतोड केली. थंडी, उन, पाऊस झेलत काबाड कष्ट केले. आता उचलीची रक्कम फिटली, कारखाने बंद झाल्यावर हक्काच्या छपराखाली जायचे तर कोरोनाचे संकट समोर उभा राहीले आहे. प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय म्हणून ऊसतोड मजुरांना क्वारंटाईन केले जात आहे. सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही निश्चितच गरजेची बाब आहे. परंतु या ऊसतोड मजुरांना क्वारंटाईनमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जात आहे. जिल्ह्यात प्रशासकीय सुचनांचे काटेकोरपणे पालन केले जात असून ऊसतोड मजुरांनीही याचे पालन करायला हवे.
देशावर कोरोना संसर्गाचे संकट उभा राहीले आहे. या संकटा डॉक्टर, पोलिस कर्नाटकातून व इतर यंत्रणा अहोरात्र परिश्रम घेत परंतु आहेत. अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयांमध्ये मजुरांनाही उपचार सुरु आहे. या आजाराचा संसर्ग जिल्ह्याच्या इतरांना होऊ नये याकरिता देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यात व जिल्ह्यात संचारबंदी असून जिल्ह्याच्या पोहचवून सिमा बंद करण्यात आल्या आहेत. या जाणार कालावधीत परजिल्ह्यातून येणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. यादरम्यानच ऊसतोडीचा हंगाम संपल्याने सांगली, प्रशासनाला
सातारा, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकातून बीड जिल्ह्यात येत आहेत. परंतु त्या भागात काही कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्याने ऊसतोड मजुरांनाही अडचणी येत आहेत. जिल्ह्याच्या सिमेवरच या मजुरांना अडवले जात असून तेथे तपासणी केली जात आहे. तसेच या सर्व मजुरांना गावापर्यंत पोहचवून तेथील देखरेख कक्षात ठेवले जाणार आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही चांगली बाब असून ऊसतोड मजुरांनीही प्रशासनाला सहकार्य करायला हवे. परंतु ऊसतोड मजुरांना देखरेख कक्षात ठेवतांना त्यांच्याकरिता उपलब्ध सोयी सुविधांचाही आढावा घेणे आवश्यक आहे. त्यांना दोन वेळचे जेवण, राहण्यासाठी चांगली जागा, पाणी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. गत सहा महिन्यापासून हे ऊसतोड मजुर राना-वनात राहून आता हक्काच्या छपराखाली थांबणार होते, परंतु त्यांना काही काळ प्रशासनाच्या निगराणीखाली रहावे लागणार आहे. या कालावधीत या ऊसतोड मजुरांचे हाल होणार नाहीत याची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
प्रशासन जनतेसाठी कार्यरत
संचारबंदी, लॉकडाऊनच्या काळात सर्वांना घरीच थांबण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. केवळ अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर पडण्यास मुभा आहे. अशा काळात पोलिस, डॉक्टर व महसुल प्रशासन जनतेसाठी कार्यरत आहे. त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या निर्देशांचे पालन जनतेने करायला हवे. यामुळे कोरोना संसर्ग लवकरात लवकर अटोक्यात येण्यास मदत होऊ शकेल.